कोल्हापूर : तीन महिन्यानंतरही २० टक्के विद्यार्थी गणवेशापासून वंचीत, महपालिका प्राथमिक शाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 18:21 IST2018-09-18T18:15:38+5:302018-09-18T18:21:59+5:30
महापालिकेच्या प्राथमिक शाळा सुरु होऊन किमान तीन महिने उलटले तरीही अद्याप २० टक्के विद्यार्थी शालेय गणवेशापासून वंचीत आहेत. महापालिकेच्या ५९ प्राथमिक शाळापैकी सुमारे ६४०२ विद्यार्थ्यांना दुहेरी गणवेशाचा लाभ मिळाला आहे.

कोल्हापूर : तीन महिन्यानंतरही २० टक्के विद्यार्थी गणवेशापासून वंचीत, महपालिका प्राथमिक शाळा
कोल्हापूर : महापालिकेच्या प्राथमिक शाळा सुरु होऊन किमान तीन महिने उलटले तरीही अद्याप २० टक्के विद्यार्थी शालेय गणवेशापासून वंचीत आहेत. महापालिकेच्या ५९ प्राथमिक शाळापैकी सुमारे ६४०२ विद्यार्थ्यांना दुहेरी गणवेशाचा लाभ मिळाला आहे. त्यामुळे वंचीत सुमारे ३१९८ विद्याथ्यांच्या गणवेशासाठी महिला व बालकल्याण विभागाकडून तरतूद करण्याची कार्यवाही सुरु आहे.
महापालिकेच्या प्राथमिक शाळातील विद्यार्थ्यांना यंदाच्यावर्षी दोन गणवेश देण्याची तरतूद करण्यात आली होती. त्यासाठी सुमारे ५८ लाख रुपयांची तरतूद केलीं आहे. त्यामध्ये शासनाच्या समग्र शिक्षा अभियानातून सुमारे ३९ लाखाचे अनुदान महापालिकेस प्राप्त झाले होते. या अभियानातून शहरातील महापालिकेच्या प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थीनी, अनुसूचित जाती-जमातीतील विद्यार्थी, दारिद्रयरेषेखालील विद्यार्थ्यांना दोन शालेय गणवेश मिळतात.
दरम्यान, हे अनुदान त्या-त्या शाळांना देऊन तीन महिने उलटले, जूनपासून सर्व शाळाही सुरु झाल्या तरीही काही शाळातील विद्यार्थ्यांच्या अंगावर गणवेश झळकले तर अनेक विद्यार्थ्यांना गणवेश मंजूर होऊनही तो अद्याप त्यांच्या अंगावर चढलेला नाही. याशिवाय शासकिय नियमानुसार या गणवेशापासून सुमारे ३१९८ मुले वंचीत राहीली आहेत.
महिला व बालकल्याण’तर्फे वंंचीतासाठी तरतूद
सर्व विद्यार्थ्यांना गणवेश मिळावा या हेतूने वंचीत विद्यार्थ्यांच्या एका गणवेशासाठी महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्यावतीने तरतूद केली आहे.पण त्यासाठी समितीच्या बैठकीतील मंजूरीची प्रतिक्षा लागून राहीली आहे.
तीन शाळांचे अहवाल अद्याप बाकी
महापालिकेच्या ५९ शाळांना हे अनुदान विद्यार्थ्यांच्या प्रमाणात वाटप करण्यात आले आहे. शाळेतील गणवेशाबाबतची पूर्तता केल्याबद्दलची परिस्थिती त्या-त्या शाळेतील व्यवस्थापन समितीने समग्र शिक्षा अभियानकडे पाठवायची आहे. त्यासाठी १२ सप्टेंबरपर्यत अंतीम मुदत होती. पण मुदतीत फक्त ४० शाळांचे अहवाल प्रशासनास प्राप्त झाले. अहवाल देण्याबाबत नोटीस बजावण्याचा धाक दाखविल्यानंतर गेल्या पाच दिवसात आणखी १६ शाळांनी अहवाल पाठविले आहे. पण अद्याप तीन शाळांचे अहवाल प्राप्त झालेले नाहीत.